मराठी भाषा अभिजात होती,राहणार तिला कोणाच्या मान्यतेचे गरज नाही- महेश कोठारे

mahesh kothare

मुंबई: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी होत असतांना. त्या मागणीचे राजकरण होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेते महेश कोठारे यांनी मराठी भाषा अभिजात होती, आहे आणि कायमच राहणार. तिला कोणाच्या मान्यतेचे गरज नाही. असे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या काही खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही. जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य ३० भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल. त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितल्याचे शिवसेनेचा खासदारांनी सांगितले होते.