मराठा आरक्षण : वाचा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय झालं?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून काल मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मॅरेथॉन चर्चा झाली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

   बैठकीत नेमकं काय झालं ?

-मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व घडामोडींची माहिती दिली.

-मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही; पण हे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार काय काय प्रयत्न करीत आहे हे जनतेसमोर प्रकर्षाने मांडण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली.
-विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी वर्षे सत्ता असतना मराठा समाजाला काहीही मिळाले नाही हे ठासून सांगण्यावर भर द्यावा .

-आपल्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतानाच मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ते प्रभावीपणे जनतेत जाऊन मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

भावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड