मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?

टीम महाराष्ट्र देशा :  मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे राजीनामे दिले आहेत. आता सत्ताधारी आणि विरोधक अशा एकूण सहा आमदारांनी आपले राजीनामे दिलेत.मात्र आता हे आमदार आगामी विधासभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मराठा समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजीनामा देत असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

या सहा आमदारांपैकी केवळ औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे मराठा आरक्षणाचं अशा पद्धतीने राजकारण होतय का अशी टीका करण्यात येतीये.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमधील काही सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असून, असा देखावा करणे चुकीचे असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केला आहे. आमदारांनी अशा प्रकारे राजीनामे देऊन केवळ ढोंगीपणा केला आहे. या राजीनाम्याला काहीही महत्त्व नसून आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित असून, त्यांनी अध्यक्षांकडे राजीनामे द्यावेत असं त्यांनी म्हंटल आहे.

bagdure

माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे

आरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे

You might also like
Comments
Loading...