मराठीतले गाजलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘तार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

nagraj manjule

मुंबई : सैराट आणि फॅन्ड्री सारखे हिट सिनेमी देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच आणखी एक सिनेमा चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक  ‘तार’ असं असणार आहे. तार आगामी शॉर्ट फिल्मचं नाव असणार आहे.  ‘

‘तार’मध्ये ते पडद्यामागे नसून ते पडद्यावर झळकणार आहेत. सैराट आणि फॅन्ड्री या सिनेमामंध्ये त्यांचा गेस्ट अँपिरिअन्स नसून या शॉर्टफिल्ममध्ये ते पोस्टमनच्या मुख्य भूमिकेत असतील. या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन पंकज सोनावणे करणार आहेत. तार या शॉर्ट फिल्मची माहिती त्यांनी स्वतः आपल्या फेसबुकवरुन दिली.

‘तार’ या शॉर्टफिल्ममध्ये नागराजसोबत भुषण मंजुळे, भुषण हंबे, विवेक जांबळे, पूजा डोळस या नामांकित कलाकारांनीही चित्रपटात काम केलं आहे. नागराज मंजुळेंच्या फँड्री आणि सैराट चित्रपटांमध्ये हे कलाकार झळकले होते. नागराज मंजुळे हे मराठीतले गाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या उत्तम कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटामध्ये नेहमीच वेगळेपण असते. त्यांच्या या वेगळेपणामुळे त्यांनी आपली एक वेगळी जागा चाहत्यांच्या मनात केली आहे.

महत्वाच्या बातम्या