राज कुंद्रा प्रकरणात ‘उमेश कामत’च्या फोटोचा वापर केल्यामुळे हिंदी वृत्तवाहिणींविरोधात एकवटले मराठी सेलिब्रिटी

umesh kamath

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात  आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेता ‘उमेश कामत’ देखील सामील असल्याचं समोर आलं होत. झाले असे की, या प्रकरणात ‘उमेश कामत’ नावाच्या आरोपीची व्हाट्सअप चॅट समोर आली होती. त्यावेळी काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरला होता. त्यामुळे आता या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या अभिनेता उमेश कामतने याविरोधात कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.

हा सगळा प्रकार लक्षात येताच अभिनेता उमेश कामतने आपल्या सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला केला आहे. आणि या बेजबाबदार वृत्तवाहिन्यांविरोधी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने लिहिले की, ‘आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी ‘उमेश कामत’ याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे.या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.’

यानंतर मराठी कलाकार देखील अभिनेता उमेश कामतच्या सामर्थनात पुढे आले आहेत. उमेशने शेअर केलेल्या पोस्टला उत्तर देत प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘अब्रू नुकसानी चा दावा नक्की ठोक UK !!! हे पहिल्यांदा नाही होते. मागच्या वेळेला पण हेच केलं होतं ह्यांनी तुझ्याबाबतीत.’ हे खूप निंदनीय आहे.’

यानंतर मराठी चित्रपटातील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते देखील पुढे आल्याचं दिसलं त्याने उमेशच्या पोस्ट ला कमेंटला करत लिहिले, खरंच कमाल आहे ह्या लोकांची!! “सर्वात आधी” च्या गडबडीत काहीही करतील! मित्रा.. तू महाराष्ट्राचा लाडका आहेस. उगाच टेंशन घेऊ नकोस. पण, किमान पत्रकारितेच्या प्रमाण नैतिकतेला अनुसरुन त्यांनी त्याच माध्यमातून त्याच लांबीच्या बातमीने दिलगिरी व्यक्त करायला हवी.. हे मात्र नक्की!! असे म्हणत त्याने उमेशला पाठिंबा दर्शवला आहे. या खेदजनक कृत्यानंतर अनेक मराठी कलाकार उमेशच्या समर्थनात पुढे आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP