fbpx

‘मराठी बिग बॉस’च्या घरातून अभिजीत केळकर बाहेर

टीम महाराष्ट्र देशा : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’.. आता थोड्या दिवसातचं ‘मराठी बिग बॉस’ प्रेक्षकांना सिझन २ चा विजेता मिळणार आहे. रविवारी सलमान खान सेट वर आल्याने सर्व प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना सरप्राईज मिळाले.

मात्र कालच्या म्हणजे विकेंडच्या डावामध्ये अभिजीत केळकर, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, आणि शिव ठाकरे या स्पर्धकांचे नॉमिनेशन साठी नावं होती. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी आरोह वेलणकर, आणि शिव ठाकरे हे सेफ असल्याचे जाहीर केले. परंतु अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे या दोघांमध्ये अभिजीत केळकर चा ‘बिग बॉस’च्या घरातला प्रवास इथेच संपला असं सांगितले. मात्र महेश मांजरेकर यांच्या या निर्णयावर कोणीच विश्वास ठेवला नाही. परंतु हा निर्णय अंतिम होता.

दरम्यान, अभिजीत केळकर ला निरोप देताना सगळ्यांचा अश्रू आवरणे कठीण झाले होते. अभिजीत आणि शिव याचं नात म्हणजे भावाचं होत. बिग बॉसच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार ठरला जाणारा आणखी एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या