दिग्गज अभिनेते विजू खोटे यांचे निधन

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता विजू खोटे यांचे सोमवारी निधन झाले. खूप दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ७७ वर्षी त्यांनी मुंबई च्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजू खोटे यांनी हिंदी चित्रपटांशिवाय ते मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले.

विजू खोटे यांनी १९६४ वर्षापासून करियरची सुरुवात केली होती. ‘शोले’ सिनेमातील ‘कालिया’ची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. छोट्या पडद्यावरील ‘जबान संभालके’ या मालिकेतही त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला होता.

‘अंदाज अपना अपना’ सिनेमातील ‘रॉबर्ट’ची भूमिकाही अजरामर आहे. याच सिनेमातील ‘गलती से मिस्टेक होगया’ डायलॉगही प्रचंड गाजला.
सिनेसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या.

विजू खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1941 मध्ये झाला. ‘या मालक’ या 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अदलाबदली’ यासारख्या मराठी चित्रपटात ते वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारु शकले.

महत्वाच्या बातम्या