एका आठवड्यात वाराणसी सोडा अन्यथा परिणाम भोगा, मराठी-गुजराती नागरिकांना जाहीर धमकी

टीम महाराष्ट्र देशा- गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावरुन मोठा विरोध होत आहे. वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे अशी धमकी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने वाराणसीत अनेक ठिकाणी पोस्टर्समध्ये लावले असून त्याच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. वाराणसी सोडून गेला नाहीत तर याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असंही पोस्टरमधून सांगण्यात आलं आहे.‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ असे या पोस्टर्सवर लिहिले आहे.

वादाचे नेमकं कारण काय ?
गुजरात येथील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर बिगर गुजरातींवर हल्ले करण्यात आले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील लोकांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांना गुजरात सोडण्यास भाग पडले आहे.

भाजप निर्लज्ज, एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच; संजय राउत