‘देवूळबंद’चं नाव मराठीत करायला सांगितलं; मग ‘ठाकरे’च्या पोस्टरचं शिवसेना काय करणार ?-तरडे

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बयोपिक ठाकरे या नावाने येत्या २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे .अभिनेता नावाजुद्दिन सिद्धीकी बाळासाहेबांचा रोल करणार असून सर्वांनाच या चित्रपटाची प्रतीक्षा आहे मात्र लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ठाकरे सिनेमाचे पोस्टर पोस्ट करून एक प्रश्न फेसबुकपोस्ट द्वारे विचारला आहे.माझ्या देवूळबंद या चित्रपटाचं पोस्टर मी इंग्रजीत केलं म्हणुन शिवसेनेच्या काही मान्यवर नेत्यांनी फोन करून ते मला मराठीत करायला सांगितलं… मी सुध्दा त्यांचं ऐकलं होतं … या पोस्टर बाबत शिवसेना काय करणार …?असा सवाल तरडे यांनी उपस्थित केला आहे. नाव बदलायला सांगणारे ‘ते’ शिवसेनेचे नेते कोण याबद्दल मात्र काहीही माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आलेली नाही .

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पटकथा असलेल्या या सिनेमाच दिग्दर्शन अभिजित पानसे हे करणार आहेत. दरम्यान बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार यावर बऱ्याच चर्चा होत होत्या. आधी अक्षय कुमार, अजय देवगन याचंही नाव भुमिकेसाठी चर्चेत आले होते. अखेर नवाजुद्दिन सिद्दिकी याचा नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.