fbpx

मराठ्यांना यश मिळणारच, राजू शेट्टींनी व्यक्त केला विश्वास

पुणे : मराठा समाजातील तरुणांनी संयम बाळगणं गरजेचं आहे, राज्यातील सर्व पक्ष, जातींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चेकाडूनही सरकारने काही केलं नाही, आता चार दिवसांपासून फोडाफोडी सुरू झाली की सरकारला जाग आली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाला नक्की यश येईल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

आज देशभरात आरक्षणासाठी आंदोलन केली जात आहेत. या सर्व जाती शेतीशी निगडित आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर महात्मा फुलेंच शेतकऱ्यांचा आसूड वाचन गरजेचं आहे. शेतीची परिस्थिती बिघडल्याने आरक्षणाची मागणी केली जात असल्याच यावेळी शेट्टी यांनी सांगितले.

आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी अनेक अडचणी आहेत, आर्थिक निकषाच्या नावाखाली मूळवर्गाला लाभ न मिळता धनदांडगे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेट्टी म्हणाले.

मराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले ?