राहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली आहेत. आरोपींची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम जाहीर करण्यात आलं आहे.

‘आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर अवश्य द्या. अत्यंत निर्घृणपणे एका निरागस, निष्पाप व्यक्तीची यांनी हत्या केली आहे’ असा मथळा लिहून मराठा युवा क्रांतीकडून रोख 50 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, 1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

आता राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे.या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही पोलिसांच्या वातीनं सांगण्यात आलं.

तर दुसरीकडे महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयमी भूमिका भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

Loading...