आझाद मैदानावर मराठा विद्यार्थी करणार आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्यसरकारने सुप्रीम कोर्टात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली. त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ. असे आश्वासन दिले होते.

Loading...

मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटलेला नाही. याच कारणामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. तसेच शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याचे आश्वासन अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून देण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली.Loading…


Loading…

Loading...