सांगली: ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या मेळाव्यासाठी ओबीसी नेते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सांगलीत आले होते. देशातील ओबीसी समाजाची अवस्था बिकट आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी आणि राजकारणात आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या साडेतीनशे जाती आहेत, त्यांना अनेकांनी देव धर्मात गुंतवून त्यांच्या विकासाकडे डोळे झाक केली, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या समाजाला घटनेने दिलेले संविधानिक अधिकार मिळवून द्यायचे, हा आमचा प्रथम अजेंडा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: