fbpx

पुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात

पुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून “मराठा संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्यानं मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पुण्यामध्ये सकाळी 9 वाजता मराठा संवाद यात्रेला सुरुवात झाली. ‘श्री शिवाजी प्रिप्रेटरी मिलिटरी स्कूल’मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून दुचाकी रॅली निघाली आहे. ही रॅली सासवडवरुन जेजुरी मार्गे बारामती आणि पुढे इंदापूरला जाईल.

राज्यभरात आजपासून (16 नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या या यात्रा 26 नोव्हेंबरला मुंबईत विधान भवनावर धडकणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या संवाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.