fbpx

…असं न झाल्यास मराठा समाज वंचित बहुजन आघाडीला साथ देणार – हर्षवर्धन जाधव

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार असल्याचे औरंगाबादचे पराभूत अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत देखील औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.

मला निवडणुकीत 2 लाख 83 हजार मतं मिळाली. ही सर्व मतं मराठा समाजाची आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाचा असंतोष ओळखावा, असं त्यांनी म्हटलं आहे.