Explained । सरकार प्रणित हेकेखोरी करणाऱ्या मराठ्यांना आम्ही भीक घालत नाही

Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी  ५८ मोर्चे शांततेत काढले होते. तेव्हाही सरकारने आंदोलनात फूट पाडत मराठ्यांना आरक्षणाचे यश पदरी पडू दिले नाही.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी  येथे उपोषण सुरू केले होते. आत्तापर्यंत मिळु न शकलेल्या आरक्षणाच्या अनुषगाने पुन्हा एकदा मराठा समाज मैदानात उतरला होता.

मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरवातीला जालना जिल्हा, कालांतराने मराठवाड्या पुरते मर्यादित होते. अंतरवाली सराटीत पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला हिंसक वळण बीडमध्ये लागलेले सगळ्यांनी पाहीले. त्यात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. काहींनी याला राजकीय फायद्यासाठी OBC विरुद्ध मराठा असा वाद निर्माण केला.

२२ डिसेंबर २०२३ नंतर ५ मिनिटही सरकारला वेळ देणार नाही, असे म्हणणारे जरांगे सरकारला २० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ देतात. त्यानंतर २० जानेवारीला मुंबईत येणार असे सांगायचे आणि नंतर परत २० जानेवारीला पायी आपण मुंबईला निघणार आणि २६ जानेवारीला मुंबईत पोहचणार असे सांगायचे. यामुळे जरांगे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारी बातमी महाराष्ट्र देशाने यापूर्वी प्रकशित केली होती.

Explained | मराठे मराठा आरक्षणाची हरलेली लढाई लढत आहेत

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. नोकरी भरती करताना मराठ्यांच्या जागा सोडून भरती करावी या प्रमुख मागण्या घेऊन मनोज जरांगे मुंबईला निघाले होते.

शेवटची लढाई म्हणून मराठा समाजाने जरांगे यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवत मुंबईकडे कूच केली. मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला रस्तात चिरडण्याचे अनेक प्रयत्न सरकारने केले. त्यावरही महाराष्ट्र देशाने प्रकाश टाकला होता.

Maratha Reservation । मनोज जरांगेंना माध्यमातून ‘गायब’ करा; सरकारी दरबारी हालचाली वाढल्या

१८ जानेवारी २०२४ रोजी सरकारने २ दिवसांत कुणबी प्रमाणपत्र ( Kunbi Certificate ) वाटप करू असे सांगितले. मात्र, सरकारमधील OBC मंत्र्यांच्या दबावामुळे जे ४५ दिवसांत शक्य झाले नाही ते २ दिवसांत कसे शक्य होईल, असा मोठा प्रश्न मराठा समाजासमोर उभा होता.

मुंबईला कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठा समाजाने ठीक-ठिकाणी JCB ने पुष्पवृष्टी करत प्रचंड प्रेम दिले. समाजाला आता आरक्षण मिळेल या आशेला लागलेल्या मराठा समाजाची काल वाशीत फसवणूक झाली.

जरांगेंनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याचे सांगत, उपोषण मागे घेतांना आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले. जरांगे सर्व मागण्या मान्य करत असल्याचा दावा करत असले तरी, प्रत्यक्षात जरांगे यांची मागणी सरकारने मान्य केलेली नाही.

ज्या मागण्या मान्य केल्याचा दावा जरांगे करतात त्या मागण्या पूर्वीपासून मान्य आहेत. वडीलांकडील नात्यात कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत ही जुनीच आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही.

जरांगे यांनी सरकारने नोकरी भरती करताना मराठ्यांच्या जागा सोडून भरती करावी अशी मागणी केली होती. परंतू असाही कुठे निर्णय झालेला नाही.  मराठा आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेणार नसल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या लाखो मराठा समाजाच्या पदरात काय पडले हा प्रश्न सद्या अनुत्तरित आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगेंनी वाशीतूनच पळ काढला अशी बातमी महाराष्ट्र देशाने प्रकशित करताच काही सरकार प्रणित हेकेखोर खालच्या पातळीत महाराष्ट्र देशाच्या टीमला शिव्या घालत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान करायला समाजाला शिकवले. विचारांची लडाई हि विचारानेच लढा, असे सांगणारे संत महाराष्ट्राला लाभले. पण सद्या याउलट घडतांना दिसत आहे.

महाराष्ट्र देशाच्या बातमीवर व्यक्त होताना सरकार प्रणित हेकेखोर आई-बहिणीवरून शिवीगाळ करत आहे, असे हे हेकेखोर मराठा समाजाचे नुकसान करत, सरकारी दरबारी शाबासकी मिळून सरकारची चाकरी करत आहे.

मराठा समाज जगभर सुशीक्षित म्हणून ओळखला जातो. त्या समाजात असे हेकेखोर असणे हे मनाला पटत नाही. हे हेकेखोर सरकार प्रणित आणि समाजात कटुता निर्माण करणारे आहेत. या सरकारच्या हेकेखोरांनी किती शिव्या-शाप दिला तरी आम्ही सत्य मांडत राहू. अशा सरकार प्रणित हेकेखोरी करणाऱ्या मराठ्यांना आम्ही भीक घालत नाही.

मराठा समाजाला आरक्षण भेटल्याचे जरांगे समर्थक आणि सरकार प्रणित हेकेखोरी करणारे मराठे प्रचार करत आहे. प्रत्यक्षात मराठ्यांच्या पदरात काहीच पडलेले नसल्याचे मराठा आरक्षण अभ्यासक सांगत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला फसवले असल्याचा आरोप कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी कालच केलेला आहे.

मनोज जरांगे यांना आपली चूक लक्षात येताच, पहिले obc  प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यन्त आंदोलन सुरु राहणार असल्याचे अंतरवाली सराटीतुन जाहीर करत आंदोलनास सुरवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button