मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असताना आता ते न्यायालयात टिकणार की नाही यावर अनेक जण आपले मत व्यक्त करत आहेत. याच दरम्यान मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

Rohan Deshmukh

तसेच देशात मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाहीत. भारिप व एमआयएम युती ही भाजपला फायदेशीर असल्याचे देखील ते म्हणाले. खोपोली येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी मराठा आरक्षण, राम मंदिर, भारिप व एमआयएम आघाडीबाबत आपले मत व्यक्त केले.

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत आठवले यांना विचारले असता मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे आठवले म्हणाले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...