मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हीच निकाली काढणार आहोत. आयोगाच्या अध्यक्षांनी आपलं काम सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा आमच्या सरकारनं केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईतल्या राजाराम महाराजांच्या कार्यक्रमात बोलत होते. कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण हेच सरकार देणार आहे असं ठणकावून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मराठा आरक्षणासाठी हवं तर आज अध्यादेश काढू शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नाही. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू . मराठा समाजाला जर कोणी आरक्षण देईल तर ते हेच सरकार असेल .आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर बाबी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. काही लोक म्हणतात अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, पण तसं केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही .ज्या लोकांना हे कळतं ते आज बोलू शकत नाहीत कारण ते दडपणात आहेत, पण ज्यांना हे कळत नाही त्यांना निश्चित भविष्यात हे कळेल की आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे.

मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू

नमाजाला भोंगे कशाला पाहिजे? घरीच नमाज पठण करा – राज ठाकरे