fbpx

मराठा आरक्षण : आंदोलनाचे नेतृत्व खा. उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार – खा.संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व खा. उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार असून नेतृत्व त्यांनी केले काय आणि मी केले काय? प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. आरक्षण मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. यापेक्षा त्यांनी पदावर राहूनच मराठा आरक्षणासाठी आग्रही रहायला हवे, अशी भूमिका खा.संभाजीराजे छत्रपती यांनी पाचगणी येथे मांडली.

दरम्यान,खासदार उदयनराजे भोसलेंनी मराठा मोर्चाचं नेतृत्त्व करावं अशी मागणी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली आहे. उदयनराजे यांच्या पुण्यातील निवासस्थानी नुकतीच भेट घेवून हि मागणी केली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार उदयनराजे महाराज व खासदार संभाजी राजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असे आवाहन नुकतेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राज्य समन्वयक शांताराम कुंजीर आणि राज्य उपाध्यक्ष अजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले होते . आता उदयनराजे काय भूमिका घेणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय : खा. उदयनराजे