मराठा आरक्षण : आजची बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण- विखे पाटील

Vikhe Patil

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आजची बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेतून सुटावा, सरकारने विशेष आधिवेशन बोलवावं, आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेतअशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाल्याची चर्चा आहे. तसेच सरकारनं आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घेण्यासही सहमती दर्शवली आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, शरद रणपिसे, अनिल परब, कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.