मराठा आरक्षण : सह्याद्रीवरील बैठक ‘फुसका बार’ ठरण्याची शक्यता

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा मोर्चाच्या आंदोलकांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. आंदोलनानंतर पहिल्यांदाच ही चर्चा होत आहे. आंदोलकांसोबत नारायण राणे आणि नितेश राणेदेखील या बैठकीला हजर आहेत. तर लातूरमध्ये झालेल्या मराठा मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय सरकारशी चर्चा करण्यासाठी गेलेल्यांचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगत ते आमचे प्रतिनिधी नसल्याचंही या आंदोलकांनी स्पष्ट केल्याने सह्याद्रीवर सुरू असलेली बैठक म्हणजे फुसका बार ठरण्याची शक्यता आहे.

मराठा मोर्चा क्रांतीचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याचे राज्य मराठा मोर्च्याचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल बोलताना वीरेंद्र म्हणाले की, आम्हाला काय हवे आहे आणि आमची भूमिका काय आहे हे आम्ही स्पष्ट केले आहे. समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटाला जाणार असल्याचे वृत्त खोटं असून, कोणीतरी अफवा पसरवत आहे. तसेच आम्ही नारायण राणे यांच्यासोबतही नाही असे पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर