मराठा आरक्षण : गडहिंग्लज येथे मराठा संघटनांचा रास्ता रोको

टीम महारष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज गडहिंग्लज येथे भारतीय मराठा संघाच्यावतीने प्रांत कार्यलयासमोर गनिमी पध्दतीने रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनाही केवळ आंदोलन बघत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही. या आंदोलनात युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या :

· मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.

· मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.

· राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.

· आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

· मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.

· अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.

· अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मराठा आरक्षण : वारकऱ्यांना वेठीस धरणारे छत्रपतींचे मावळे असूच शकत नाहीत – मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या