मराठा आरक्षण : अंबाजोगाईत मराठा आरक्षणासाठी ठिय्या

अंबाजोगाई : परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला.यावेळी उपविभागीय अधिकार्यांना सकल मराठा समाज व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वाचा राज्यभरात कुठे काय घडले?

परळी – परळीत (जि. बीड) बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर सुरू असलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम होते. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारपर्यंत परळी, माजलगाव, अंबाजोगाई, केज येथे राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक अशोक पन्हाळकर यांनी सांगितले. गेवराईत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धारुरमध्ये शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सोलापूर- मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.

केज- केजमध्ये मोर्चा काढून रास्ता राको आंदोलन झाले. माजलगाव येथे परभणी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरी येथेही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

मुंबई- मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.

परभणी- परभणीत वसमत रोड आणि जिंतूर रोडवर दगडफेक करीत आंदोलकांनी पाच बस फोडल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातुरातील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंडण करीत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.
कळंब- कळंब येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला़ तुळजापूर येथे बंद पाळून आंदोलन करण्यात आले़ जालना जिल्ह्यात जाफ्राबाद, परतूर व मंठा येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.

नांदेड- मराठा आरक्षणाचा मुद्दा नागपूर अधिवेशनात उपस्थित न केल्याच्या निषेधार्थ नांदेड येथे मराठा समाजाच्या काही तरुणांनी स्थानिक सर्वपक्षीय मराठा आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले़
बीड- मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ शुक्रवारी बीड जिल्ह्यात ठिय्या, धरणे आंदोलन सुरू आहे. माजलगाव येथे शुक्रवारी परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या:
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

जय भीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा – रामदास आठवले

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

You might also like
Comments
Loading...