मराठा आरक्षण : रामदास आठवलेंनी सुचवला तोडगा

रामदास आठवले
नवी दिल्ली : आरक्षणासंदर्भातील टक्केवारीत वाढ करण्याची गरज असल्याचं मत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे मराठा आरक्षणाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर या ! आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

आरक्षणासंदर्भातील टक्केवारीत वाढ करण्याची गरज आहे.त्यासाठी आपण संसदेत हा मुद्दा उचलून धरणार आहोत. मराठा आंदोलकांनी शांतपणे आपल्या मागण्या मागाव्यात.आरक्षण हे 50 ते 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी संसदेत चर्चा करणार असून तसा कायदा होणे गरजेचे असल्याचेही आठवले यांनी म्हटले.

 

भाजप-सेनेची युती झाली तर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार- रामदास आठवले