वाचा कोण आहे काकासाहेब शिंदे पाटील, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी दिले बलिदान

औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांत्री मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली.

राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळताना दिसत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज गोदावरी नदीवर जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी अनेक तरुणांनी पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखल. मात्र, काकासाहेब शिंदे या युवकाने नदीपात्रामध्ये उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

प्राथमिक माहितीनुसार, काकासाहेब शिंदे हा मराठा युवक मुळचा गंगापूर येथील असल्याचं कळतय. तसेच त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरून तो शिवसैनिक असल्याच दिसत आहे. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी गंगापूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु केल आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तर सोशल मिडीयावर देखील संतापाची लाट आली आहे.

 

You might also like
Comments
Loading...