‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणा’ पुणे महापालिका सभागृहात

पुणे : राज्यभर सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे पडसाद पुणे महापालिका सभागृहात देखील पहायला मिळाले आहेत. आज झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी एक मराठा लाख मराठांच्या घोषणा दिल्या आहेत.

सभेच्या सुरुवातीला सर्वप्रथम पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सभा तहकुबी मांडण्यात आली. दरम्यान, यावेळी विरोधकांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकुबी मांडली.

यावेळी विरोधकांकडून तहकूबीवर बोलण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपने थेट राष्ट्रगीत घेऊन  सभा गुंडाळली. या तहकुबीवर भाजपची गोची झाल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या काही मराठा नगरसेवकांनी सभागृहात “एक मराठा लाख मराठा”, “भाजप हमसे डरती है, सभा तहकुब करती है”ची घोषणाबाजी केली.

मौत और कफ़न बाँध कर चल रहा हूँ, सलाखों से नहीं डरता : हार्दिक पटेल