मराठा आरक्षण : समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा नितेश राणेंचा गौप्यस्फोट

मुंबई : मराठा आंदोलकांच्या आडमुठेपणामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे तशा आशयाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला इतकंच नाही तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचाही गौप्यस्फोट या क्लिपमध्ये करण्यात आलाय.

या ऑडिओ क्लीपमध्ये मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणून बुजून टाळल्याचा आरोप देखील केला आहे.

प्रसार माध्यमातून नितेश राणे यांची क्लिप व्हायरल प्रकरणी परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजाबद्दल आदर असला असता तर ती क्लीप व्हायरलच झाली नसती. राज्यातले आंदोलन हे जनआंदोलन असून या आंदोलनाचा कुणी प्रमुख नाही. या आंदोलनात सहभागी होणारा प्रत्येक मराठा बांधव या आंदोलनाचा प्रमुख आहे. जे काही निर्णय होईल तो परळीतच होईल या मतावर आबासाहेब पाटील आजही ठाम आहेत. या आधी सरकारकडून आलेले पत्र आंदोलन स्थळी वाचून दाखवण्यात आले आहेत, कोणतीही गोष्ट कोणापासून लपवली नाही, असे ते म्हणाले.

दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार