fbpx

मराठा आरक्षण : नितेश राणेंनी पुरावे असतील तर सादर करावेत : आबासाहेब पाटील

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आंदोलनाच्या समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंना भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राणे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राणेंच्या या दाव्यावर मराठा संघटनेनं आक्रमक भूमिका घेत ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याची मागणी केली आहे. पुरावे असतील ते सादर करा… पुराव्यांशिवाय बोलू नका… असंही मराठा क्रांती ठोक मोर्चा अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय.

मराठा आंदोलकांच्या आडमुठेपणामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे तशा आशयाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला इतकंच नाही तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याचाही गौप्यस्फोट या क्लिपमध्ये करण्यात आलाय.

या ऑडिओ क्लीपमध्ये मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणून बुजून टाळल्याचा आरोप देखील केला आहे.

प्रसार माध्यमातून नितेश राणे यांची क्लिप व्हायरल प्रकरणी परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजाबद्दल आदर असला असता तर ती क्लीप व्हायरलच झाली नसती. राज्यातले आंदोलन हे जनआंदोलन असून या आंदोलनाचा कुणी प्रमुख नाही. या आंदोलनात सहभागी होणारा प्रत्येक मराठा बांधव या आंदोलनाचा प्रमुख आहे. जे काही निर्णय होईल तो परळीतच होईल या मतावर आबासाहेब पाटील आजही ठाम आहेत. या आधी सरकारकडून आलेले पत्र आंदोलन स्थळी वाचून दाखवण्यात आले आहेत, कोणतीही गोष्ट कोणापासून लपवली नाही, असे ते म्हणाले.

मराठा आंदोलन पेटवणाऱ्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात

राणेंना भाजपची ऑफर अमान्य ?