पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले : खेडेकर

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असल्याचा आरोप मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडकर यांनी शनिवारी केला. सांगलीत ते बोलत होते. यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, शाहीर पाटील यांचे भाषण झाले. यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील आदी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले पुरुषोत्तम खेडकर ?
राज्यावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची सर्वाधिक काळ सत्ता होती तसेच ओबीसीमधून 1962 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होते. मात्र, त्यानंतर मात्र, तत्कालीन नेत्यांनी कधी आरक्षणाच्या विषयाकडे गंभीरपणे पाहिले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील त्याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे- पाटील यांचे ओबीसीचे दाखले आहेत. त्यांनी समाजातील इतरांनाही आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण तसे होत नाही.

मराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा