मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू

Maratha Kranti Morcha

टीम महाराष्ट्र देशा : उच्च न्यायालयाकडून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे, यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

दरम्यान उच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळली आहे. न्यायालाने याची फेटाळल्याने मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला.