मराठा आरक्षण ; मराठा महासंघाच्यावतीने शनिशिंगणापूरात मुख्यमंत्र्यांच्या नावे अभिषेक

टीम महाराष्ट्र देशा :  मुंबई उच्च न्यायालयात काल ( गुरुवार ) मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. काल ( गुरुवार ) मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला. दरम्यान मराठा महासंघाच्यावतीने शनिशिंगणापूर येथील शनी मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या नावे शनी अभिषेक करून सरकारचे आभार मानले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली. दरम्यान मराठा महासंघाने शनिशिंगणापूर येथील शनी मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या नावे शनी अभिषेक करून सरकारचे आभार मानले आहेत.

Loading...

शनिशिंगणापूर इथे मराठा महासंघाच्यावतीने घेण्यात आलेल्या शेतकरी-वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा शब्द दिला होता. तसेच मुख्यमंत्रांनी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू लावून मराठा आरक्षणाचा शब्द पाळला आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार म्हणून शनीशिंगणापूर येथे वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर शेतकरी मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे शनीला तेलाचा अभिषेकही केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले