fbpx

मराठा समाजाला मोठा दिलासा, तूर्तास आरक्षणला स्थगिती नाही

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारने शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱयांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यासाठी नुकतेच आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने पाऊल उचलले. मात्र याला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हरकत घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस दिली असून दोन आठवड्यानंतर स्थगितीवर सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालच्या निर्णयाला हरकत घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस देतानाच दोन आठवड्यापर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.