fbpx

मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरु

Maratha Kranti Morcha

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

मराठा आरक्षणाविषयी मागास प्रवर्ग आयोगाचा तयार केलेला अहवाल जसाच्या तसा कोर्टात मांडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्यानंतर 29 जानेवारीला हा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आला. त्यात मराठा ही वेगळी जात नसून ती कुणबी जातीतच मोडते, असं मागास प्रवर्ग आयोगाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी रास्त असून त्यांना 16 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारनं त्यांच्या अहवालातून केली आहे. दोन्ही सभागृहात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाचा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होईल.