fbpx

जाणून घ्या आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय होणार फायदे ?

Maratha Kranti Morcha

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.

आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय मिळणार?

  • शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण
  • राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये 16 टक्के राखीव जागा
  • विशेष प्रवर्ग तयार करुन मराठ्यांना आरक्षण
  • अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था, अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण
  • राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांमध्ये 16 टक्के आरक्षण

कृती अहवालातील महत्त्वाचे मुद्दे-

  • ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण
  • मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध
  • 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार फक्त उन्नत आणि प्रगत गटाखालील व्यक्तींना मिळणार आरक्षण