मराठा आरक्षण : खा. उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद

पुणे मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण विषयावर विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आह साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली.मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती.दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

खा. उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे :
-उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित
– पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका
दररोज वर्तमानपत्र वाचून कळत कोणाची काही हरकत नाही, कोणची हरकत नाही मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडवला गेला नाही, त्यांच्या मनात जो प्रश्न तो माझ्या मनात आहे
-मराठा, धनगर, मुस्लीमांना सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे
– दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही
– अध्यादेश वैगरे काहीही कामाचे नाही
– मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते
– खासदार उदयनराजे समन्वय समितीसोबत चर्चा करणार
– कायदा सुव्यवस्था हातात न घेण्याचं आवाहन
– कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का नाही?
– इतकी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का ठेवला?
– मराठा आरक्षण परिषद घेऊन सगळ्यांची मतं घेऊ, त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाशी मी बांधिल असेन : उदयनराजे भोसले.
– दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही : उदयनराजे भोसले
– सरकारने मराठा आंदोलकांवरील केस तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा त्याचा भडका होईल, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही : उदयनराजे भोसले.
-आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस : उदयनराजे भोसले.
-मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे : उदयनराजे भोसले.
-ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी : उदयनराजे भोसले.
-मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते : उदयनराजे भोसले.
-मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कोणत्याही अन्य मुद्द्याशी जोडू नका, ना राजकारण, ना अन्य समाजाशी तुलना नको : उदयनराजे भोसले.
-मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती : उदयनराजे भोसले.
: उदयनराजे भोसले.
-25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण : उदयनराजे भोसले.

पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका, खा. उदयनराजें उपहासात्मक टोला