मराठा आरक्षण : जुमलेबाजी अंगाशी आली : सचिन सावंत

टीम महाराष्ट्र देशा – ‘सतत जनतेची फसवणूक केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर ही नामुष्की ओढवली असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणाऱ्या महापूजेसाठी मी जाणार नाही,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली यावर सावंत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सचिन सावंत यांनी ?

‘सतत जनतेची फसवणूक केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर ही नामुष्की ओढवली आहे. जुमलेबाजी अंगाशी आली आहे. भाजपाच्या खोटारडेपणामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या शासकीय महापूजेची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होत आहे याचं दुःख काँग्रेसला आहे’. अशा शब्दात त्यांनी ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी बंदूकबाज मंत्र्यांला जबाबदारीतून मुक्त करून हॉलीवूडला पाठवावे

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर – सचिन सावंत