मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खा. राजू शेट्टी, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश अबिटकर, आ. सत्यजित पाटील, आ. उल्हास पाटील, आ. नरेंद्र पाटील उपस्थित होते.

25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण ? खा. उदयनराजे

आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरमध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून ठिय्या आंदोलन सुरू असून, आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त होणे गरजेचे – मेटे