फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात

भवानीनगर –  आततायीपणे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. फक्त मुख्यमंत्री फडणवीसच आरक्षण देऊ शकतात, इतर कोणी देऊच शकणार नाही. असं वक्तव्प पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भिगवणमध्ये केले.

राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासंदर्भात विचारले असता जानकर म्हणाले, ‘मराठा, धनगर आरक्षणात युवकांनी संयम ठेवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तावून सुलाखून लिहिली आहे. आरक्षण देताना घटनेचा आधार घेऊनच बार्टीचा, वेगवेगळ्या संस्थांचा अहवाल, ऐतिहासिक परंपरा याचा विचार केला जातो. त्याचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.”

मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयाबाबत प्रामाणिक व ठाम आहेत. आम्ही तर आज साडेतीन वर्षेच झाली सत्तेवर आलो आहोत. आरक्षण का मिळाले नाही, हा प्रश्न गेली कित्येक वर्षे राज्य करणाऱ्यांनादेखील विचारायला हवा. असंही ते यावेळी म्हणाले.

सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ

मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका