मराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र बंद’ नंतर आता ‘जेल भरो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक मध्ये याची सुरुवात झाली आहे आणि यामुळे नाशिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल आहे. आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.

मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पुकारूनही सरकार मराठा समाजाला आरक्षणाचं ठोस आश्वासन देत नसल्याने मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे या आंदोलकांनी आजपासून जेलभरो आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, लातूर, नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या मालेगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ आज सकाळी शेकडो आंदोलकांनी एकत्र जमून जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली करत अटक करवून घेतली.

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे

आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार : नारायण राणे