मराठा आरक्षण : मावळा संघटनेच्या नेत्या रूपाली पाटील यांच्याविरूद्ध तक्रार

परळी (जि. बीड) : पुण्यातील मावळा संघटनेच्या नेत्या रूपाली पाटील आणि नितेश राणे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होई. आता या प्रकरणाने नवं वळण घेतले असून रूपाली पाटील विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दिली आहे.

१८ दिवसांपासून परळीत मराठा आराक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आपल्या जिवाला धोका आहे. हे आंदोलन स्थगित करण्याच्या हेतूने व आपली समाजात प्रतीमा मलीन करण्याच्या दृष्टीने हे सर्व षडयंत्र रचल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच या क्लिपमुळे माझी समाजात बदनामी झाली असून, माझ्यासह कुटुंबाला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शाहरुख खानला नोटीस

आरक्षण म्हणजे कलंक, अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा