मराठा नेत्याकडून ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक आणून, ते मंजूर केल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू करण्यात आला. मात्र, ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी मिळून मराठा आरक्षणाला विरोध सुरु केला. त्यात  गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी 23 जानेवारील होणार आहे.

याच दरम्यान आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणालाच मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून बाळासाहेब सराटेंनी केली आहे.

बाळासाहेब सराटेंनी याचिकेत नेमकी काय मागणी केली आहे ?

इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

तसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.

You might also like
Comments
Loading...