मराठा आरक्षण : अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे.

काँग्रेसचे काही आमदार राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. काँग्रेसच्या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 7 झाली आहे.

मराठा आरक्षण : सोलापुरातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांचा राजीनामा