मराठा आरक्षण : ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण, आज ठरली पुढची दिशा

पुणे : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत असून, तब्बल ५७ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे वातावरण अधिक चिघळत होते. त्यामुळे मराठा समाजाकडून आता आमदार खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने करण्यात येत आहेत.

दरम्यान, ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर  आज ( ७ ऑगस्ट ) पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली . या बैठकीत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मोर्चाची दिशा ठरवण्यात आली.

पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर २ ते ३ तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

याप्रसंगी समन्वयक समितीद्वारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलं आहे. तर ९ ऑगस्ट ला राज्यात कोणताही बंद करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केलेली नाही. मात्र ,जनभावना लक्षात घेता या दिवशी अघोषित बंद होण्याची शक्यता असल्याच देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरक्षण म्हणजे कलंक, अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा