७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम

ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार,

परळी: ७ ऑगस्टपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा ९ ऑगस्टपासून राज्यभरातील ठिय्या आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा सकल मराठा मोर्चाकडून देण्यात आला आहे. परळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

समाजातील आंदोलकांनी कोणतीही तोडफोड, जाळपोळ न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडून जोपर्यंत ठोस निर्णय जाहीर केला जाणार नाही, तोपर्यंत आपले आंदोलन हे सुरूच राहणार असल्याच, यावेळी आंदोलकांनी सांगितले.

आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, मुख्यमंत्र्यांनी स्वत: सर्व सूत्रे हाती घेत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.