मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुख

मुंबई : राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी जीवित आणि आर्थिक हानी न करता सबुरीने घ्यावं. असा सल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

काकासाहेब शिंदे या युवकांच्या मृत्यूनंतर राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचेच पडसाद ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या कायगावमध्ये जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

मराठा ठोक मोर्चा : औरंगाबाद मध्ये इंटरनेट सेवा बंद

सोलापूर : मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी गाड्यांची तोडफोड

दरम्यान, शांततेत असणारा जमाव आता आक्रमक झाल्याने आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे आक्रमक न होता मराठा मोर्चेकऱ्यांनी शांततेत घेण्याच आवाहन देशमुख यांनी केले आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.