मराठा आंदोलक मावळे नाहीत …तर मग शत्रु औरंगजेब व त्याची फौज कोण ?

  एक मराठा लाख मराठा …. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही …. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांचा मराठ्यांचा ताफा पंढरपुरच्या दिशेने निघाला होता. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या जनआंदोलनाला मुक नव्हे तर आत्ता ठोक मोर्चांना सुरवात झाली होती. आषाढी एकादशीला महापुजेला येताना मराठा समाजाच्या मागण्यांचे थेट लेखी आदेशच घेऊन या नाही तर येऊ नका असा थेट इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्यांनतर महाराष्ट्रभरात सर्वत्र मराठे रस्त्यावर ऊतरले आणी मराठ्यांचे रौद्ररुप अवघ्या दोन दिवसात पहायला मिळाले. बसेस पेटवल्या गेल्या. अनेक बसवर दगडफेक करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे काम मराठा आंदोलकांनी केले. परिस्थिती हाताबाहेर जातानाचे चित्र दिसताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना दौरा रद्द केल्याचे महाराष्ट्रासमोर सागांयला लावले. आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही बेजबाबदार विधानं केली. खरं तर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मागे टाकण्याचा प्रयत्न होतोय का हे यानिमीत्ताने पाहिले पाहिजे.

मुख्यमंत्री म्हणाले की वारकऱ्यांना वेठिस धरुन आंदोलन करणारे छत्रपतींचे मावळे असु शकत नाहीत असे म्हणत एक प्रकारे मराठा आंदोलक हे छत्रपतीचे मावळे नाहीत असाच मतीत अर्थ मुख्यमंत्री यानी लावला. चला ठिक आहे थोडा वेळ असे म्हणुया की हिसक आदोंलन करणारे मावळे असुच शकत नाहीत . तर मग रायगडावरुन शिवराज्याभिषेक दिनाला दोन वर्षापुर्वी खोटे अश्वासन देणारे हेच ते मुख्यमंत्री महोदय खरे मावळे आहेत का ? मिळालेले मराठा आरक्षण रद्द झाले त्यासाठी न पळणारे मुख्यमंत्री हे छत्रपतींचे मावळे आहेत का ? किसान सभेच्या लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा पायी चालत मुबंई मध्ये येऊन धडकला त्यांना खोटे अश्वासन देऊन वेळ काढणारे मुख्यमंत्री छत्रपतीचें मावळे आहेत का ? मुबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारक प्रकल्पवार सतत खोटी खोटी अश्वासने देणारे मुख्यमंत्री छत्रपतींचे मावळे आहेत का ? मराठा व दलित यांच्या भिमा कोरेगाव च्या दंगलीत आरोपींना मोकाट सोडणारे मुख्यमंत्री छत्रपतींचे खरे मावळे आहेत का ? असे अनेक प्रश्नचिन्ह मुख्यमंत्र्यांच्या छत्रपती प्रेमाबद्दल निर्माण होतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे माव केवळ निवडणुकित प्रचारासाठी मतापुरंतेच वापरणारे मुख्यमंत्री खरे मावळे आहेत का ??संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु एक पाऊल पुढे होता असे म्हणत संताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न करणारे मुख्यमंत्री खरे मावळे आहेत का ? असे प्रश्न महाराष्ट्रातील पाच साडेबारा कोटी मराठ्यांना नक्की पडले असतील. पण या सगळ्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलताना मात्र आरक्षणाला वेळ का लागतोय यावर गप्प बसले आहेत. ठोस पण आरक्षण कधी मिळणार हे मात्र सागुं शकले नाहीत.

मिडीयाशी बोलताना मुख्यमंत्री भेदरलेले तर दिसत होतेच पण मी घाबरलो नाही हे दाखवण्यासाठी मला झेड सुरक्षा आहे मी माझ्यावर हल्ला होऊ शकत नाही असे अहंकारी वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुळात मराठा समाजापुढे कितीही मोठे सुरक्षेचे जाळे असले तरी ते सहज आरापार करु शकतात हा मराठ्यांचा इतिहास साक्षीला आहे. पुणे येथील लालमहालात शत्रु च्या छावणीत लाखांच्या फौजेत घुसुन शाहिस्तेखानाची बोटे कापली होती हा इतिहास कदाचित मुख्यमंत्र्यांनी तपासला पाहिजे. पण मुळात मुख्यमंत्र्यांना झेड सुरक्षेत फिरणाची वेळ का आली यावर संशोधन होणे गरजेचे आहे .

शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी , अनेक अनुदानं बंद केली, मराठा समाजाला मिळालेले अारक्षण कोर्टात वाचवु शकले नाहीत, कित्येक वर्षानंतर देखील शिवस्मारकाचे काम सुरु नाही, अण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत मिळणारे कर्ज मिळत नाही . मराठा समाजाला कोणतेही ठोस लेखी अश्वासन नाही, धनगर आरक्षणाचा मुद्दा , महादेव कोळी समाजाच्या मागण्या , मुस्लिम समाजाच्या मागण्या , गोकार्यकर्त्यांचा धर्माच्या व जातीच्या नावाखाली होणारा ऊन्माद, शेतीमालला न मिळणारा हमीभाव आणी सर्वात महत्वाचे म्हणजै राज्यात सामाजिक वाढलेली गुन्हेगारी आणी गृहमंत्री पद हातात असतानाही सातत्याने होत असलेली हत्याकांडे अशा अनेक गोष्टीमुळे मुख्यमंत्री व सरकारवर सर्वच घटकातील लोक नाराज दिसुन येत आहेत. मुंबईच्या मोर्चात मराठ्यांचा मुख्यमंत्री फडणविस यांनी विश्वास घात केला असा लोकांचा समज आहे. म्हणुन हा लोकांचा रोष आहे, हा आक्रोश आहे. मराठा आंदोलनाच्या जिवावर तयार झालेले नेते सरकारने फोडले त्यांना आमदारकी व खासदारी दिल्याने मराठा समाज सरकारवर चिडलेला आहे. मुख्यमंत्री काही जरी बोलले तरी सध्या समाज मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणार नाही अशी बोताची परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी मुख्यमंत्री म्हणाले की मी वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी मी पंढरपुर दौरा रद्द करित आहे. जर तुम्हाला झेड सुरक्षा आहे तर राज्याचा पोलिस बंदोबस्त पंढरपुरात का आणला हा भाबडा प्रश्न मोर्चेकरांना पडलेला आहे.

मराठा आरक्षणाचा भडका का ऊडाला हे देखील तपासले पाहिजे. समाजाने 57 मुक मोर्चे काढले. प्रत्येक जिल्ह्यात मुक मोर्चे निघाले. शांतता , शिस्त , स्वच्छता , आणी कायदा सुव्यवस्थेचा आदर कसा ठेवावा तसेच आंदोलन कसे करावे याचे जागतिक दर्जाचे आंदोलन सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी कोपर्डीच्या प्रकरणावरुन जगाला दर्शन घडवुन दाखवले. अतिशय नियोजनबद्ध असे सत्तर ते 80 लाख लोकसंख्येंचे मोर्चे मराठा समाजाने काढले पण महाराष्ट्रात एक रुपयाचे देखील नुकसान मागिल मोर्चाच्या दिवसात झाले नाही. तेव्हा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशीच अश्वासने दिली व वेळ मारुन नेली. पुन्हा मराठा समाज गेल्या आठ दिवसाखाली रस्त्यावर ऊतरला पण सरकारने पाहिजे तशी दखल वेळीच न घेतलेल्याने आंदोलनाचे प्रतिक ठरलेल्या मराठ्यांनी रौद्ररुप धारण करुन आषाढी वारीत गनिमी काव्याने सरकारवर दबाव टाकण्यासाठी हिंसक आदोंलनाचा पवित्रा घेतला. अन मुख्यमत्र्यांना मराठा स्टाईल आंदोलनाचा दणका मराठ्यांनी बसेस फोडुन दिला. शिस्तबध्द , सयंमी , शांत आदर्श असे कोटीच्या घरात मोर्चा काढुन जागतिक स्तरावर आंदोलन कसे असावे याचा आदर्श घालुन देणारा समाज आज रस्त्यावर का ऊतरला याचं संशोधन सरकारने गरजेचे आहे. टाचणी पडली तरी लाखांच्या मुक मोर्चातुन आवाज येत होता आणी अाज शंभर दिडशे मराठ्यांच्या तुकड्या खळखट्याक करुन सरकारला मुख्यमंत्र्याना जेरिस आणीत आहेत.

झेड सुरक्षेत फिरायची वेळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर का आली ? मराठा आरक्षणाच्या फसव्या घोषणा , फसवी कर्जमाफी , शेतीमालाला हमीभाव नाही, सतत राज्यात होणारे सामाजिक हत्याकांडे , धनगर आरक्षण , महादेव कोऴी समाजाच्या मागण्या , मराठवाडा विदर्भाच्या विविध मागण्या , इंदु मिलवरील डाँ बाबासाहेब आबेंडकर यांचे स्मारक , अरबी समुद्रातील शिवस्मारक , विद्यापिठांचे नामांतरवाद , वाढता जातीय व धर्मवाद , गोरक्षकांचा ऊन्माद , सरकारचा जाहिरातीवरल अवास्तव खर्च, कोणतेही नवीन ऊद्योग व्यावसाय , नौकऱ्या नाहीत. आत्ता सरकारने 72 हजार नौकऱ्याची घोषणा केली . यासाठी कोणताही प्रोग्राम सरकारकडे नाही. केवळ इतर घोषणांप्रमाणे ही घोषणाच राहण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठ्यांच्या दबावामुळे सरकारने 16 टक्के घोषणा केली पण कोणतेही लेखी आदेश अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे लेखी आदेश येईपर्यंत यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एखादी केलेली घोषणा पुर्ण केली असे कोणताही ठोस निर्णय सरकारने घेतला नाही त्यामुळे सरकारवर मराठा धनगर मुस्लिम समाजासह शेतकरी बांधवांचा विश्वास राहिला नाही असे चित्र आहे. जनतेचा रोष व आक्रोष वाढतच जात आहे. सुरक्षा वाढवण्याचं कारण एकच आहे की पदाला न्याय देता आला नाही .

पण मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की छत्रपतींचे खरे मावळे वारकऱ्यांना वेठीस धरु शकत नाहीत मग मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाणारे व त्यासाठी योग्य पाठपुरावा न करणारे औरंगजेब व त्याची फौज आहे का असा प्रतिप्रश्न सकल मराठा समाजाला पडला आहे. छत्रपती – मावळा – स्वराज्य अशा भावनिक शब्दात किती दिवस वेळ काढणार आहात. आरक्षणाचा निर्णय ठोस दिल्यानंतर हाच मराठा फडणवीस व सरकारला डोक्यावर घेऊन नाचेल पण असाच विश्वासघात करित राहिले तर हाच मराठा पायाखाली तुडवेल ही ताकद मराठा समाजात आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवरतानाची मोठी ताकद मराठा व धनगर , मुस्लिम व शेतकरी समाजाच्या हातात आहे त्यामुळे सरकारने व मुख्यमंत्री महोदयांनी वेळीच विचार करणे गरजेचे आहे. नंतर वेळ निघुन गेलेली असेल. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वक्तव्य केले की आगामी आषाढी वारीपर्यंत मराठा आरक्षण न मिळाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल . पण आगामी वारीपर्यंत हे सरकार सत्तेवर राहिल का नाही याची शक्यता फार कमी आहे.

पत्रकार हर्षल बागल

(राजकिय व सामाजिक विश्लेषक)

कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री