मराठा आरक्षण : सांगलीत बस पेटवली, नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

सांगली : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. सांगलीतल्या मांगलेमध्ये आक्रमक आंदोलकांनी जाळपोळ करत राज्य परिवहनची बस पेटवून दिली आहे. त्यामुळे हे आंदोलन अजूनही शांत झालेलं नाही. अजूनही अनेक ठिकाणी थोड्यापार प्रमाणत याचे हिंसक पडसाद उमटताना दिसत आहेत.

सर्व जातींना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची केंद्र सरकारची तयारी

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांने जलसमाधी घेतली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्च्याचे आंदोलनाचे पडसाद राज्यात दिसून आले. काल नवी मुंबईमध्येही हिंसक वळण लागले. कळंबोली, कोपरखैराने येथे जाळपोळीच्या घटना घडल्यात. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. तसेच आज दुसऱ्या दिवशीही परिसरात तणाव दिसून आलाय. त्यामुळे कोणतीही अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षण : सोलापुरात होणाऱ्या जागरण गोंधळ आंदोलनात सुशीलकुमार शिंदे होणार सहभागी

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...