सोवळ प्रकरणी पुण्यात मराठा क्रांती ‘निषेध’ मोर्चा

मागील वर्षी याच दिवशी पुण्यात निघाला होता विराट मराठा क्रांती ‘मूक’ मोर्चा

पुण्यातील ‘सोवळ’ प्रकरणाचा वाद थांबताना दिसत नाही. आता या वादात मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी उडी घेतली असून डॉ. मेधा खोले यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी तसेच निर्मला यादव यांच्या समर्थनार्थ २५ सप्टेंबरला पुण्यात ‘निषेध’मोर्चा काढण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी मराठा आरक्षणासाठी २५ सप्टेंबरलाच पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. माघील मोर्चा हा मूक होता मात्र आताचा मोर्चा हा ठोक असेल तसेच डॉ मेधा खोले यांनी यादव यांच्यावरील तक्रार मागे घेतली असली तरी आमची बाजू खरी असल्याने यादव या तक्रार मागे घेणार नसल्याच पत्रकार परिषदेत सांगण्यात आल आहे.

२५ तारखेला सकाळी ११ वाजता लाल महाल ते पोलीस आयुक्तालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे