मराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Rohan Deshmukh

नगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे यात्रा येवला गावात पोहोचणार आहे़ संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.

त्यानंतर येत्या २६ नोव्हेंबर रोजी यात्रा विधानमंडळावर धडकणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला संजीव भोर, संजय अनभुले, शिवाजी चौधरी, मदन मोकाटे, सचिन चौगुले,सुभाष जंगले, नितीन पठारे, संदीप चोरमले, विजय पठारे, मयूर वांढेकर, प्रमोद भासार, मंगेश आजबे, शरद कार्ले, नंदकुमार कोतकर, विशाल म्हस्के, गणेश शिंदे, शरद दळवी, अमोल पाठक, दीपक मोरे, ज्ञानदेव दिघे, राजेंद्र कर्डिले, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रकाश कदम, गोरख आढाव आदी उपस्थित होते़

Latur Advt
You might also like
Comments
Loading...