Maratha- मराठा आरक्षणासाठी आता अर्धनग्न मराठा क्रांती मोर्चा !

पुण्यात 10 मे रोजी मोर्चा

राज्यभर लाखोंच्या संख्येने मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले मात्र तरीही आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुण्यात 10 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजातील तरुण या मोर्चात अर्धनग्न होऊन सामील होणार आहेत. विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाचं राजकारण केल्याचा आरोप प्रा. संभाजी पाटील यांनी केला असून नेते, राजकारण्यांनी आगामी मोर्च्यात सहभागी होऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय